सलमानचा रुद्रावतार, सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर ‘दबंग’गिरी करताना कॅमेऱ्यात कैद

1756

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर चांगलाच भडकला आहे. सलमानने रागाच्या भरात त्या चाहत्याचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला आणि त्याला दमही दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार गोवा विमानतळावर घडल्याची माहिती मिळत आहे.

सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘राधे’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान मंगळवारी सकाळी गोवा विमातळावर पोहोचला. यावेळी एका चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा आणि व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. पण सलमान खानने पळत येत रागाने त्याच्या हातातून फोन काढून घेतला आणि त्याला दमही दिला. सलमानची ‘दबंग’गिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान, सलमान खान याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. चाहत्यांच्या जोरावर कलाकारांना एवढी प्रसिद्धी मिळते आणि त्यांच्याशी कलाकर असे वागत असतील तर हे चुकीचे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या