अभिनेता संजय दत्तची तब्येत बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल

2212

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय दत्त याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, संजय दत्त याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला नॉन-कोविड वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांचे एक पथक उपचार करत आहे.

संजय दत्त मुंबईत एकटाच राहात असून लॉकडाऊन सुरू झाल्या पासूनच पत्नी मान्यता व दोन्ही मुलं शहरान व इकरा दुबईत राहात आहेत. या काळात संजय दत्त आपल्या कुटुंबाला मिस करत असून त्याने अनेकदा सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या