बॉलिवूडच्या ‘हवाहवाई’ला राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या दिलखेच अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झाले. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५५ व्या वर्षी श्रीदेवी यांनी अचानक घेतलेली एक्झिट साऱ्यांच्याच मनाला चटका लावून गेली. श्रीदेवींना अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली.