वाढदिवसाच्या पार्टीला ड्रग्ज घेतले, बॉलिवूड अभिनेत्रीला रंगेहात अटक

आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला अंमली पदार्थांचं सेवन केल्या प्रकरणी एका बॉलिवूड अभिनेत्रीला अटक झाली आहे. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांताक्रुझ परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या अभिनेत्रीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला पोलिसांनी हॉटेलवर छापे टाकले. तेव्हा या अभिनेत्रीला अंमली पदार्थाचं सेवन करताना पोलिसांनी रंगेहात पकडलं. तिच्याकडे चरसही सापडले आहेत.

या अभिनेत्रीचं नाव नायरा नेहल शहा असं असून ती बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये झळकली आहे. तिच्यासह तिचा मित्र आशिक हुसैन यालाही अंमली पदार्थ सेवन करताना अटक झाली आहे. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नायराने दोन तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिला सांताक्रुझ न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या