अभिनेत्री तारा सुतारिया हिने बॉलीवूड इंडस्ट्रीत फार कमी वेळात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी तिची चाहत्यांमध्ये कायम चर्चा असते. अभिनेत्री तारा सुतारिया हिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.तिच्या लेहेंग्यातील लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या सर्वत्र तिच्या या फोटोंची चर्चा आहे. पिवळ्या रंगांच्या डीपनेक ब्लाऊज घालून डिझायनर लेहेंग्यात तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.