मी पँट पाहिलीय आणि त्यातले 100 रुपये देखील! अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सणकावलं

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही हिंदुस्थानचा यष्टीरक्षक रिषभ पंतवरून सातत्याने चर्चेत असते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रिषभने कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. यानंतर त्याच्या चाहत्यांनी उर्वशीला ट्रोल करायला सुरुवात केली होती. यातल्या एकाला उर्वशीने चांगलंच सणकावलं आहे.

रिषभ पंत याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद 100 धावांची खेळी साकारली होती. ही खेळी पाहणाऱ्या त्याच्या एका चाहत्याने लगेच उर्वशीला प्रश्न विचारला होता की, पंत का 100 देखा की नहीं ? (पंतचे शतक पाहिलेस की नाही) यानंतर भडकलेल्या उर्वशी रौतेलाने रिषभच्या आडनावाची खिल्ली उडवत त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं. तिने म्हटलंय की ‘तुझं म्हणणं पँट आहे का ? हो मी पाहिलीय. सगळेजण पँट घालतात आणि त्यातले 100 रुपये पण मी पाहिले आहेत’ उर्वशीचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तिच्या या उत्तरामुळे रिषभ पंत याचे चाहते संतापले आहे.

उर्वशीचा रिषभवर राग का आहे ?

2018-2019 मध्ये उर्वशी आणि रिषभ यांच्यात प्रेमांकुर फुलल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे अनेकदा एकत्रही दिसून आले होते. मात्र काही दिवसानंतर दोघांनी एकमेकांना ब्लॉक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. उर्वशीच्या व्यवस्थापकाने माध्यमांशी याबाबत बोलताना सांगितलं होतं की रिषभ आणि उर्वशी या दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवलं असून दोघे एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही असं ठरवण्यात आलं होतं. रिषभ पंत आणि ईशा नेगी हे दोघे आता एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. ईशा ही एक उद्योजिका असून ती सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते.