‘भेडिया’ सिनेमाचा टिझर पाहून येईल अंगावर काटा, वरुण दिसतोय भयानक अवतारात

बॉलीवू़ड अभिनेता वरुण धवन आणि कृती सेनन यांच्या ‘भेडिया’  सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली होती. मात्र या सिनेमाचा टीजर लॉन्च करण्यात आला असून टिझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.   सोबत या सिनेमाची ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर केली आहे.

मागच्या दिवसांमध्ये सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून लोकं या सिनेमाच्या ट्रेलरची प्रतिक्षा करत होते. मात्र आता चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रोलर 19 ऑक्टोबरला रिलीज करणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे ‘भेडिया’चे टिझर बघताच क्षणी अंगावर शहारे येतील. टीझरमध्ये लांडग्याची कहाणी एका भितीदायक आवाजात दाखवली आहे. हा लांडगा आपल्या पापी पोटासाठी माणसांनाच आपली शिकार बनवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

मिट्ट काळोख आणि जोरदार रॅपने सुरू होणारा हा टीझर तुम्हाला हादरवून सोडणारा आहे. एका मिनीटाच्या टीझरमध्ये एक जंगली रहस्य लपलेले दिसत आहे. टीझरमध्ये रात्री घनदाट जंगलाच्या काळोखात वरुण धावताना दिसत आहे. तर दुसऱ्या ठिकाणी गावातील काही लोकं एका प्राण्याला जाळताना दिसत आहेत. त्या आगीत एका लांडग्याची आकृती दिसत आहे. सिनेमात कृति सेनने महत्वाचा रोल केला आहे. मात्र टीझरमध्ये ती न दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 ‘भेडिया’ हा पहिला हिंदुस्थानी वन्यप्राण्यावर आधारित विनोदी सिनेमा आहे. ज्याचा ट्रेलर 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अमर कौशिक यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 25 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.