
चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रीचे काम करायचे म्हटल्यास तुमच्या सौंदर्याला, फिटनेसलाही तितकेच महत्त्व असते. कथेची गरज नसेल तर टक्कल पडलेला, बेढब दिसणाऱ्याला चित्रपटात कोणताही निर्माता घेणार नाही. त्यामुळे कलाकार आपल्या फिटनेस, सौंदर्यावर मोठा खर्चही करताना दिसतात. परंतु आपण नेहमी पडद्यावर पाहतो तसेच खऱ्या आयुष्यात कलाकार दिसतात का? तर नाही. खूप कमी अभिनेते रिल आणि रिअल लाईफमध्येही सारखे दिसतात. आज आपण काही अशा अभिनेत्यांबाबत माहिती घेऊ ज्यांना खरे तर टक्कल पडले आहे मात्र त्यांनी हेअर ट्रान्सप्लान्ट केले आहे.
सलमान खान
बॉलिवूडचा भाई सलमान खान यानेही हेअर ट्रान्सप्लान्ट केले आहे. दुबईमध्ये जाऊन त्यांनी हेअर रेस्टोरेशन प्रोसेसच्या मदतीने केस घनदाट केले आहेत.
गोविंदा
एकेकाळचा सुपरहिट अभिनेता गोविंदा हा देखील केसगळतीचा शिकार झाला होता. परंतु नंतर त्यानेही हेअर ट्रान्सप्लान्ट करून घेतले.
संजय दत्त
संजय दत्त याला टकलू अवतार तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिला असेल. रिअल लाईफमध्येही त्याचे केस उडाले होते, मात्र अमेरिकेत जाऊन त्याने स्ट्रिप ट्रीटमेंट घेतली, तसेच पॉलिक्युअर युनिट ट्रान्सप्लांटेशनचेही त्याने मदत घेतली.
अक्षय कुमार
खिलाडी अक्षय कुमार याचेही केस चाळीशीनंतर गळू लागले. परंतु यापासून सुटका मिळवण्यासाठी त्याने फॉसिक्युअर युनिट ट्रान्सप्लांटेशनची मदत घेतली.
कपिल शर्मा
कॉमेडिचा बादशाह कपिल शर्माच्या डोक्यावरील केसही विरळ झाले होते. परंतु त्याने रोबोटिक हेअर ट्रान्सप्लान्ट सर्जरी करून डोक्यावरील केस घनदाट करून घेतले.