
बॉलिवूडमधील हिट चित्रपटांमधील तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे धूम…या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धूम गाजवली होती. या या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. धूम या गाजलेल्या चित्रपटात हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते.
संजय गढवी नेहमीप्रमाणे अंधेरीतील लोखंडवाला परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. त्यांना प्रचंड घाम फुटला. यानंतर त्यांना तातडीने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. संजय गढवी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. संजय यांच्या पार्थिवावर संध्याकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संजय गढवी यांनी यशराज फिल्म्सच्या सहकार्याने ‘धूम 1’ आणि ‘धूम 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशन झळकले होते. ‘मेरे यार की शादी है’, ‘तेरे लिए’, ‘किडनॅप’, ‘अजब गजब लव्ह’ आणि ‘ऑपरेशन परिंदे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.