अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घरावर आयकर धाडी; कर चोरी प्रकरणी तपास सुरू

taapsee pannu anurag kashyap

बॉलीवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मनटेना यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. मधु मनटेनाच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी Kwaan च्या ऑफिसवर देखील आयकर अधिकारी पोहोचले आहेत. फँटम फिल्मच्या कर चोरी संदर्भात या धाडी टाकल्या आहेत.

आयकर विभागाच्या सूत्रांचं म्हणणं आहे की, कर चोरी प्रकरणात फँटम फिल्म सोबत जोडलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि अन्य काही नावांचा समावेश आहे. फँटम फिल्म द्वारे कर चोरीच्या प्रकरणात अन्य काही व्यक्तींचा शोध सुरू आहे.

आयकर विभागाची पथकं मुंबई, पुण्यासह 20 ठिकाणांवर एकसाथ धाडी टाकत आहेत.

‘दोबारा’मध्ये तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप

गेल्या महिन्यातच बालाजी टेलीफिल्म्सच्या नव्या डिव्हीजन कल्ट मूवीजने ‘दोबारा’ चा टीझर रिलीज केला होता. चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे आणि अनुराग कश्यप या थ्रिलरचे दिग्दर्शन करत आहे. या टीझरमध्ये तापसी आणि अनुराग दोघेही एकत्र दिसले होते.

आपली प्रतिक्रिया द्या