याचे कपडे कुठे गेले? जॉन अब्राहमने शेअर केला न्यूड फोटो

अभिनेता जॉन अब्राहम जा त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये त्याच्या अंगावर एकही कपडा दिसत नाहीये. त्याचा हा न्यूड फोटो त्याच्या चाहत्यांना भलताच आवडला असून त्यांनी या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सोशल मिडीयावर सक्रीय अभिनेत्यांमध्ये जॉनचं नाव घेतलं जातं. त्याचे वेगवेगळ्या कपड्यांमधील फोटो तो चाहत्यांसोबत कायम शेअर करत असतो. आजही त्याने एक फोटो शेअर केला होता. इतर फोटोंमध्ये आणि आजच्या फोटोमध्ये फरक इतकाच होता की या फोटोत त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता.

जॉन हा पिळदार देहाचा आणि देखणा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या कमालीच्या फिटनेसमुळे तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. बहुसंख्या चित्रपट दिग्दर्शक-निर्माते हे त्यांच्या अॅक्शन चित्रपटांसाठी जॉनलाच पहिली पसंती देताना पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे अभिनेते आगामी चित्रपटांना अनुसरुन फोटो शेअर करत असतात. मात्र जॉनने नग्नावस्थेतील फोटो का शेअर केला असावा असा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

जॉनने जो फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यात त्याने काहीच कपडे घातलेले नाहीत. या फोटोत जॉन एका उशीने कंबरेखालचा भाग झाकला असून तो सोफ्यावर बसलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना जॉनने खाली वॉडरोबच्या प्रतिक्षेत…असे कॅप्शन दिले आहे.

सध्या जॉन त्याच्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘मुंबई सागा’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेमध्ये असून इमरान हाशमी, काजल अग्रवाल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 19 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या