Photo – रकूल प्रितने चंदेरी लेहेंग्यामध्ये इंटरनेटचा वाढवला पारा, फोटो पाहून व्हाल घायाळ

बॉलीवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंहने आपल्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. आता चाहत्यांना रकूलचे एथनिक लूक पाहायला मिळाले आहे. तिने नुकतेच इंस्टावर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

रकूलने लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. ज्यात ती चंदेरी लेहेंग्यामध्ये गॉर्जिअस दिसत आहे.

या फोटोंमध्ये रकूलने चंदेरी रंगाचा लेहेंगा घातला असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्रीने या लेहेंग्यावर केस मोकळे ठेवले असून ग्लॉसी मेकअप आणि गळ्यात सुंदर डायमण्ड नेकपीस घातला आहे.

तिने आपले फोटो शेअर करताना त्याखाली लिहीलेय, हिऱ्यासारखे चमका अशी फोटोओळ दिली आहे.

या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत असून तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

रकूलचा ‘छतरीवाली’ हा सिनेमा आला होता, या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन पसंतीही दिली.

रकुलच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाले तर रकुल सध्या अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी यांना डेट करत आहे.