फोटोशूट करून ऋषी कपूर यांचे कमबॅक

810

बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी कॅन्सर आजारातून पूर्ण बरे झाल्याची वर्दी चाहत्यांना दिली आहे.  फोटोशूट करून ते जणू चाहत्यांना भेटायला आले आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी ऋषी कपूर यांचे फोटोशूट केले आहे. त्यातील एक फोटो ऋषी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोचे चाहते दमदार स्वागत करीत आहेत. गेल्या वर्षी ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. अलीकडेच ते मायदेशी परतले. मुंबईत परतल्याचा आनंद यावेळी त्यांच्या चेहऱयावर ओसंडून वाहताना दिसत होता. आता फोटोच्या माध्यमातून ते चाहत्यांना भेटायला सज्ज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या