कोलकातामध्ये राणी मुखर्जी-काजोलच्या भावाला अटक, दुचाकीचालकाला दिली धडक

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोलचा चुलत भाऊ आणि बंगाली अभिनेता सम्राट मुखर्जी याला कोलकातामध्ये अटक करण्यात आली आहे. भरधाव कार चालवून बाईकस्वाराला धडक दिल्याचा आरोप आहे. कोलकाताच्या बेहाला येथून त्याला अटक करण्यात आली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, बेहालाच्या विद्यासागर कॉलनी येथील 29 वर्षीय जखमी तरुणाला आधी एम.आर. बंगुर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातप्ररकरणी सम्राटची चौकशी केली जात आहे. बाईकस्वार रात्री साडेबाराच्या सुमारास घरी परतत होता. मात्र त्याचवेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जखमी होऊन तो जागीच बेशुद्ध झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, सम्राट मुखर्जी बेहाला चौरास्ताहून टॉलीगंजच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याचे अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि तो बाईकला जाऊन धडकला. बाईकला धडक दिल्यानंतर त्याची कार एका घरावर धडकली. यात त्या घराची काम्पाउंड वॉलचेही नुकसान झाले. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. बेहाला पोलिसांनी कारवाई करत सम्राट याची कार जप्त केली आहे. कोलकाताच्या अलीपूर न्यायलयात मंगळवारी हजर केल्यानंतर त्याला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे.

सम्राट हा काजोल मुखर्जी, राणी मुखर्जी आणि ब्रम्हास्त्र सिनेमाचे निर्माता अयान मुखर्जी यांचा चुलत भाऊ आहे. त्याने राम और श्याम, भाई भाई, जंजीर यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. शिवाय तपेश्या, काका नंबर 1 आणि आकाश कुसूम सारख्या बंगाल टीव्ही शोमध्ये भूमिका केल्या आहेत.