बिग बॉस 13 च्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जागा करणारी सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शहनाज गिल तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे कायम चर्चेत असते. मात्र आता सध्या ती तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच शहनाजने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शहनाजने तिच्या लेटेस्ट फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे. ज्यासोबत तिने लाल रंगाचा लांब स्कार्फ घेतला आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी शहनाजने बोल्ड मोकअप केला असून वेट हेअर्स ठेवले आहेत.
शहनाजने या ड्रेसवर गळ्यात मॅचिंग नेकलेस घातला असून हातात एक 3 कडे घातले आहेत. तसेच बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घातल्या आहेत.
या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोझ देत कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये शहनाज गिलचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर लूक पाहायला मिळत आहे. हे पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.