प्रजासत्ताक दिनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, शिल्पा शेट्टी होत आहे ट्रोल…

26 जानेवारी 2021 रोजी हिंदुस्थानी आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. यानिमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह राहणाऱ्या शिल्पा शेट्टीनेही तिच्या चाहत्यांचे शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तिच्या एका चुकीमुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

प्रजासत्ताक दिनी शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिल्पाने लिहिले आहे की, ’72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व हिंदुस्थानींना हॅपी रिपब्लिक डे. चला राज्यघटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्याची प्रतिज्ञा करूया…फक्त आपल्यासाठी नाही तर सर्व नागरिकांसाठी. जय हिंद.’

capture-24

तिच्या या ट्विटनंतर अनेक नेटकाऱ्यानी तिला ट्रॉल करण्यास सुरुवात केली. यानंतर लगेच तिने आपलं हे ट्विट डिलीट करत प्रजासत्ताक दिन केलं.

आपली प्रतिक्रिया द्या