एकाच शाळेत, वर्गात शिकायचे हे बॉलिवूड स्टार्स, एकीचा तर ‘हा’ अभिनेता होता क्रश

1858

शाळा म्हटले की प्रत्येक जण जुन्या दिवसांमध्ये रमून जातो. खेळण्याचा, बागडण्याचा, शिकण्याचा आणि आयुष्यभर पुरतील अशी मित्र जोडण्याचे ते दिवस. पण शाळा संपते आणि प्रत्येक जण आपल्या मार्गाने जातो, मागे उरतात फक्त आठवणी व न तुटणारी मैत्री. बॉलिवूडमध्येही असे काही स्टार्स आहेत जे एकमेकांच्या शाळेत, वर्गात होते. आज इतक्या वर्षानंतरही ते चांगले मित्र असून पडद्यावर एकत्र कामही करत आहेत.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर –

tiger-shroff-shraddha-kapoo
बॉलिवूडचा डान्सर व अॅक्शन हिरो टायगर श्रॉफव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर शाळेमध्ये एकाच वर्गात शिकायची. हे दोघेही मुंबईतील अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये एकाच वर्गात शिकले. दोघेही शाळेपासून खूप चांगले मित्र आहेत. बागी या चित्रपटामध्ये ही जोडी एकत्र पडद्यावरही पाहायला मिळाली. करण जोहरच्या शोमध्ये बोलताना श्रद्धाने टायगर आपला शाळेच्या दिवसातील क्रश होता असे सांगितले होते.

वरुण धवन आणि अर्जुन कपूर –

varun-dhawan-arjun-kapoor
अभिनेता वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांच्या मैत्रीचे बॉलिवूडमध्ये अनेक किस्से आहेत. किस्से तर असणारच कारण हे दोघेही एकमेकांच्या शाळेच्या दिवसातील हिस्सा आहेत. दोघेही एकाच अॅक्टिंग स्कूलमध्ये शिकले आहेत. तेव्हापासून दोघेही चांगले मित्र आहेत.

करण जोहर आणि ट्विंकल खन्ना –

karan-johar-twinkle-khanna
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री ट्विकल खन्ना देखील वर्गमित्र आहेत. दोघेही एका बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिक्षत होते. करण जोहरच्या कॉफी विद करण या शोमध्ये आली असताना दोघांनीही आपल्या शाळेच्या दिवसातील आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.

सलमान खान आणि आमिर खान –

aamir-salman
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दबंग सलमान खान हे देखील एका वर्गात शिकायचे. दुसरीच्या वर्गात हे दोघे एका वर्गात होते. त्यावेळी दोघांची मैत्री नव्हती, मात्र आता दोघेही खूपच चांगले मित्र आहेत. या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.

ह्रतिक रोशन आणि उदय चोप्रा –

hrithik-roshan-uday-chopra
बॉलिवूडचा डान्सर सुपरहिरो ह्रतिक रोशन आणि चित्रपट निर्माता उदय चोप्रा हे देखील बालपणीचे मित्र आहेत. दोघेही चौथीपासून एकत्र आहेत. दोघांनी धूम-2 या चित्रपटामध्ये एकत्र कामही केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या