होय, मी समलैंगिक नात्यात आहे! बॉलिवूडच्या प्रसिद्ध लेखकाचा 13 वर्षांनंतर खुलासा

20656
gay-new

समलैंगिकता आणि समलैंगिक नाती यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. कलम 377 हटवल्यानंतर एलजीबीटीक्यू समूहातील अनेक जण धाडसाने पुढे येऊन या विषयांवर व्यक्त होत आहेत. या दरम्यान, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध लेखक-संकलकाने आपल्या समलैंगिक नात्याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

apurva-asrani

या लेखकाचं नाव अपूर्व असरानी असं आहे. समलैंगिकतेवर आधारित अलीगढ या चित्रपटाचं लेखन अपूर्व याने केलं आहे. याखेरीज सत्या, शाहिद हे चित्रपट आणि मेड इन हेवन या वेबसीरीजचं संकलनही केलं आहे. अपूर्व गेली 13 वर्षं सिद्धांत नावाच्या त्याच्या जोडीदारासोबत राहत होता. मात्र, त्याने आपल्या समलैंगिक नात्याविषयी कुणालाही काहीही सांगितलं नव्हतं.

नुकतंच अपूर्व आणि सिद्धांत यांनी स्वतःचं घर खरेदी केलं आहे. त्याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करताना अपूर्व म्हणतो की, 13 वर्षांपर्यंत आम्ही एकमेकांचे भाऊ असल्याचं नाटक केलं. जेणेकरून आम्ही एकत्र भाड्याच्या घरात राहू शकू. आम्हाला आमच्या घराचे पडदे बंद ठेवण्याचा सल्ला दिला गेला होता. कारण, शेजाऱ्यांना आमच्या नात्याविषयी कळू नये. पण, आता आम्ही स्वतःचं घर खरेदी केलं आहे. आता आम्ही समोरून आमच्या शेजाऱ्यांना आमच्या नात्याबद्दल सांगतो. एलजीबीटीक्यू पद्धतीच्या कुटुंबाचा सामाजिक स्वीकार करण्याची वेळ आली आहे, असं ट्वीट अपूर्व याने केलं आहे. या दोघांवर बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या