काबुलमध्ये लग्नसमारंभात भीषण बॉम्बस्फोट, 63 जण ठार, 182 जखमी

696
फोटो प्रातिनिधिक

अफगाणिस्तानची राजधानी असलेलं काबुल शहर भीषण स्फोटाने हादरलं आहे. येथे सुरू असलेल्या एका लग्नसमारंभात बॉम्बस्फोट होऊन 63 जण ठार तर 182 जण जखमी झाले आहेत. नागरी युद्धाच्या तलखीत पोळलेल्या काबुलमध्ये शनिवारी रात्री हा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता पाहता मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या