प्रजासत्ताकदिनी मणिपूर, आसाम साखळी बॉम्बस्फोटाने हादरले

17

 

सामना ऑनलाईन। मणिपूर

देशभरात ६८ वा प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा होत असतानाच ईशान्येकडील मणिपूर आणि आसाम साखळी बॉम्बस्फोटाने हादरले आहे. उल्फा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले आहेत. यातील सहा स्फोट आसाममध्ये व दोन स्फोट मणिपूर येथे झाले आहेत. मोकळ्या जागेत हे स्फोट घडविण्यात आल्याने यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

आज सकाळी नऊच्या सुमारास आसाममध्ये एकापाठोपाठ एक असे सहा स्फोट दहशतवाद्यांनी केले.त्यानंतर लगेचच मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये दोन स्फोट घडविण्यात आले.यातील पहिला स्फोट मंत्रीपुखरी परिसरात तर दुसरा स्फोट कॉलेज रोड भागात झाला आहे.

दरम्यान हे सर्व स्फोट दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचे आसामचे जिल्हा पोलिस अधिक्षक मुकेश सहाय यांनी स्पष्ट केले आहे.    

आपली प्रतिक्रिया द्या