जयपुरहून अयोध्येला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विनामात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली होती. या घटनेला काही तास होत नाहीत तोच आता दिल्ली वरून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI127 या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यामुळे विमानाचं कॅनडामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशी सुरक्षित असून विमानाचं कॅनडामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तसेच विमानतळावर स्थानिक एजन्सींच्या मदतीने विमानाची तसेच प्रवाशांच्या साहित्याची कसून तपासणी केली जात आहे. “गेल्या काही दिवसांमध्ये एअर इंडियासह इतर स्थानिक विमान कंपन्यांना धमकीचे मेसेज येत आहेत. मात्र, तपासणी केली असता सर्व धमक्या खोट्या असल्याचे आढळून आले आहे. असे असले तरी प्रवाशांची जबाबदारी लक्षात घेता एअरलाइन ऑपरेटर म्हणून आम्ही प्रत्येक धोका गांभीर्याने घेत आहोत, अशी माहिती एअर इंडियाने दिली.