हा फक्त शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विजय! – अंबादास दानवे

दसरा मेळाव्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे हा फक्त शिवसेनेचा विजय नसून हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. उच्च न्यायालयाने शिवतीर्थावर शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ते बोलत होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 1966 पासून या मैदानावरून भाषण करत आलेले आहेत. हे भाषण नसून विचारांचे सोने आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले. तसेच या निर्णयामुळे पुन्हा एकदा न्यायदेवतेवरील विश्वास दृढ झालेला आहे. जे कोणी बंडखोर, गद्दार आहेत त्यांना उच्च न्यायालयाने चांगली चपराक लगावली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.