मुंबईतील वाढत्या ट्रफिकवर हायकोर्टाची खंत

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या वाढत्या ट्रफिकचा मुंबईकरांना दररोज सामना करावा लागतो. या ट्रफिकमुळे नागरिकांना इच्छितस्थळी वेळेत पोहचताही येत नाही. एवढेच काय तर या वाहतूककोंडीत रुग्णवाहिकाही अनेक वेळा अडकून पडतात अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतल्या ट्रफिकवर नाराजी व्यक्त केली.

शहरातील वाढत्या पार्किंगच्या समस्येबाबत भगवानजी रैयानी यांच्या जनहित मंचने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेकर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांनी वाहनचालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे शहरात नेहमी वाहतूककोंडी होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पालिका व वाहतूक पोलीसही या पार्किंगच्या समस्येकर कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला सांगितले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने प्रशासनाच्या कारभाराकर टीका केली.

मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा दिवसभराचा वेग अवघा ताशी २० कि.मी. असल्याचे पालिकेनेही ही बाब हायकोर्टात मान्य केले. याचा जास्तीत जास्त फटका अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना बसत असून ट्रफिकमुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहचता येत नसल्याचे न्यायमूर्तींनी प्रशासनाला सांगितले. रुग्णालयात जाण्याकरिता पर्यायी मार्ग नसल्याची खंतही खंडपीठाने यावेळी व्यक्त केली. नवीन वाहन खरेदी करणाऱयांना पार्किंग उपलब्ध असल्याचे पुरावे सक्तीचे करण्याबाबत प्रशासनाने विचार केला पाहिजे, असेही खंडपीठ म्हणाले.

– मुंबईच्या डिपी प्लानमध्ये विशेष पार्किंग प्राधिकरणाचा प्रस्ताव
पार्किंग तसेच ट्रफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हे पाहता मुंबईच्या विकास आराखड्यात स्वतंत्र्य पार्किंग प्राधिकरण निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. पालिकेच्या या निर्णयाचे हायकोर्टाने स्वागत केले आहे.