‘मधुमेह विरुद्ध आपण’चे रविवारी प्रकाशन

 

सामना ऑनलाईन, मुंबई – आयुर्वेदाचे अभ्यासक डॉ. अश्विन सावंत यांनी लिहिलेल्या  ‘मधुमेह विरुद्ध आपण’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २६ फेब्रुवारी रोजी मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणार आहे. डॉ. संजय ओक यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.

या पुस्तकात डॉ. अश्विन सावंत यांनी मधुमेहाशी संबंधित सर्वच्या सर्व पैलूंची माहिती अत्यंत सोप्या भाषेत करून दिली आहे, अशी माहिती या पुस्तकाचे प्रकाशक, नवता बुक वर्ल्डचे संचालक कीर्तिकुमार शिंदे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या