48 वर्षांनंतर बांगलादेशने मिटवले पाकिस्तानचे ‘नामोनिशाण’

146
bangladesh-hasina


मुक्तीसंग्राम लढाईच्या 48 वर्षांनंतर बांगलादेशने सीमेवर असणाऱ्या सर्व खांबांवरून पाकिस्तानचे नाव हटवले आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशने स्वतःच्या पैशातून हे काम पूर्ण केले आहे. 1947 सालच्या हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीनंतर हे खांब बसवण्यात आले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निर्देशावरून सीमेवर असणाऱ्या खांबांवरून पाकिस्तान नाव हटवण्याचे काम करण्यात आले. आता बांगलादेशात सीमेवरील सर्व खांबांवर पाकिस्तान/पीएके ऐवजी बांगलादेश/बीडी हे नाव असेल असे बॉर्डर गार्ड बांगलादेशकडून सांगण्यात आले. 1971 सालच्या युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानचा दारुण पराभव करून बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या