बॉर्डरलेस स्वप्नांचा कश्मीरपर्यंतचा प्रवास

38

>>शुभांगी बागडे<<

एका सर्कसामान्य कुटुंबातील तरुण राज्यशास्त्राचे शिक्षण घेत असताना अभ्यासदौऱयाच्या निमित्ताने कश्मीरला गेला आणि हा दौरा आयुष्याला वेगळं वळण देणारा ठरला. हा तरुण म्हणजे बॉर्डरलेस वर्ल्ड फांऊंडेशनचे संस्थापक अधिक कदम. अधिक कदम यांना या भेटीत आईवडिलांचे छत्र हरकलेली, केविलवाण्या नजरेने सभोवताली पाहणारी मुले दिसली. या मुलांसाठी काम करत कश्मीर हेच आपले कार्यक्षेत्र हे त्यांनी ठरवलं.

अधिक कदम हे पुण्यातील महाविद्यालयाचे राज्यशास्त्राचे किद्यार्थी. कश्मीरसंबंधी असलेल्या  कलम ३७०चा अभ्यास करताना त्यांच्या मनात कश्मीरसंबंधी अनेक प्रश्न उभे राहिले. त्यातूनच कश्मीरचा अभ्यासदौरा आखला गेला. १९९७ मधील या दौऱयात कश्मिरी पंडितांची स्थिती, त्यांच्या समस्या आदींविषयी त्यांना जाणून घेता आले. पुण्यात आल्यावरही त्यांनी या विषयाचा अभ्यास सुरूच ठेवला. तेव्हाच १९९८ मध्ये मित्रांच्या मदतीने आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कश्मीरमध्ये त्यांनी एका शांतता यात्रेचे आयोजन केले. हिंदू-मुस्लिम यांच्यात सद्भाव निर्माण करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली. स्थानिक, लष्करी अधिकारी यांच्याशी जास्तीत जास्त संकाद साधून तिथल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बारामुल्ला, कुपवाडा या भागांत अतिरेक्यांच्या वाढलेल्या कारवायांमुळे प्रचंड अशांतता होती. अशा काळात अधिक कदम व त्यांचे सहकारी यांच्यावर कोण विश्वास ठेवणार मात्र अशा अवघड स्थितीतही इथे आदर्श व शांतता कायम ठेवण्याचं काम या मंडळींनी हाती घेतले.

याच काळात युनिसेफच्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने अनाथ मुलांच्या समस्यांचे भीषण रूप अधिक यांच्यासमोर आले. इथला अनाथ मुलांचा आकडा पाहून त्यांना धक्काच बसला. ही अनाथ मुले वाईट मार्गाकडे खेचली जात होती. अतिरेकी कारवायांसाठी या मुलांचा सर्रास वापर होत होता. ती व्यसनांच्या आहारी जात होती. मुलींची अवस्था तर याहून बिकट होती. मुलींचे आयुष्य सुरक्षित आणि किमान सुविधांसह उभे राहू शकेल अशी कोणतीही व्यवस्थाच नसल्याने या मुली अत्याचाराच्याही बळी ठरत होत्या. त्यातूनच मग काही मुली अजाणत्या वयात गर्भवती राहिल्या होत्या. या मुलींच्या भवितव्यासाठी भरीव कार्य करण्याचं अधिक यांनी ठरवलं. मार्च २००२ मध्ये अधिक आणि भारती यांनी ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ची स्थापना केली. मुलींसाठी त्यांनी कुपवाडय़ात  घर उभारले. त्यांच्या या कामाला खूप विरोध झाला. तिथल्या मौलवींनी अधिक यांना खूप विरोध केला. इतकंच नव्हे तर अधिक यांना दहशतवाद्यांकडून धमक्याही आल्या. या दरम्यान ते अनेकदा अतिरेक्यांच्या ताकडीत सापडले.  २००६ मध्ये बडगाम व अनंतनाग येथे ‘बसेरा-ए-तबस्सूमची स्थापना केली. अधिक यांचयासाठी अत्यंत कठीण असा हा प्रवास होता. या कामात अनेकदा  त्यांच्यावर  जीवाकर बेतणारे प्रसंग समोर आले. अशाच एका प्रसगाचे अधिक यांनी केलेले वर्णन अंगावर शहारा आणणरे आहे. मात्र यात अधिक यांनी कुठेही काम थांबू दिले नाही. अशा बाका प्रसंग येताच अतिरेक्यांशी संवाद साधून प्रसंग निभावायचं कौशल्य त्यांना प्राप्त झालं होतं. दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलं की ते अनेक प्रश्नांचा मारा करतात. अशावेळी स्थानिक असल्याप्रमाणे त्यांनी प्रसंगातून निभावलं आहे. अधिक यांची अनेकदा अतिरेक्यांशी गाठ पडली, परंतु त्याने स्थानिकांशी, प्रसंगी अतिरेक्यांशी आणि लष्कराशीही संवाद सुरूच ठेवला. हाच त्यांच्या कामाला पुढे नेणारा त्यांचा महत्त्वाचा गुण ठरला.

आता बॉडर्रलेस कर्ल्ड फाऊंडेशनचा पसारा काढला आहे. मुलींचे पालक विश्वासाने त्यांची जबाबदारी त्यांच्याकर सोपवतात. या मुलींना अधिक आणि त्याचे सहकारी मुंबई-पुण्याच्या भेटीकरही घेऊन येतात. एक हिंदू तरुण मुस्लिम समाजात येऊन काम करतो आणि तेही मुस्लिम मुलींच्या पुनर्वसनाचे हे सगळेच कोणत्याही चौकटीत न बसणारे! निर्धार, प्रामाणिकपणा आणि जिद्द यातून अधिकने ते साध्य केले.

एकदा नजीकच्या गावचे एक सरपंच तीन मुलींना बसेरा-ए-तबस्सूममध्ये प्रकेश देण्यासाठी घेऊन आले. १५ महिन्यांची सोहा, सहा वर्षांची रोशनी आणि १६ कर्षांची हलिमा यांना दहशतवाद्यांच्या एका हल्ल्याने निराधार करून टाकले होते. या तिघींचेही पालकत्व अधिकने घेतले. असे कितीतरी प्रसंग अधिकशी बोलताना शहारे आणतात. अतिरेक्यांशी झालेल्या सामन्यापेक्षाही मुलींच्या हरवलेल्या बालपणाच्या एकेक गोष्टींनी माणुसकीविषयीच प्रश्न निर्माण होतात. अर्थात, विपरीत स्थितीतील अशा अनेक मुलींचा भाग्योदय बसेरा-ए-तबस्सूममध्ये होतो आहे. दहशतवाद्यांच्या छायेतील काळेकुट्ट दिवस या कश्मिरी कळय़ांना विसरायचे आहेत. माणुसकीची खिडकी त्यांच्याही आयुष्यात किलकिली झाली आहे. अधिकच्या कामाने आता वेग घेतला. आनंद निवासांसाठी स्वत:ची वास्तू उभारण्याचे ध्येय त्याने ठरकले आहे. त्या कामातही त्याला यश मिळेलच.

राजनैतिक डावपेचांनी आणि लष्कराच्या चढायांनी सीमांचे प्रश्न सुटतील तेव्हा सुटतील, दोन माणसांच्या मनात धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या सीमा पुसट होत जाऊन अखेर खरोखरचे ‘बॉर्डरलेस’ जग अस्तित्वात येईल तेव्हा येईल पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी असेच अधिकचे कदम पडत राहतील असा किश्वास अधिक कदम आणि त्याच्या सहकाऱयांनी आपल्या सगळय़ांच्या मनात निर्माण केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या