बोरीची महिला पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

643

परभणीतील बोरी येथील पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस कर्मचारी कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह आली असून त्यामुळे बोरी व परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पोलिस कर्मचारी ही बोरी शहरातील कौसडी फाटा येथे दैनंदिन कर्तव्य चोखपणे बजावत होती. गेल्या काही दिवसांपासून आजारपणाची लक्षणे आढळून येत असल्याने ती सुट्टीवर गेली होती. काही दिवसांपूर्वी या महिला कर्मचाऱ्याने कोरोना तपासणी केली होती. तेव्हापासून ती परभणी येथे तिच्या घरीच होती.

काल मंगळवारी, २६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता तिचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन ती महिला पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे नमुद करण्यात आले आहे. सदरील महिला पोलीस कर्मचारीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासन शोध घेत असून बोरीचे पोलीस ठाणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातून चौकशी करूनच काम असणा-यांना प्रवेश देण्यात येईल तसेच बोरी पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना बोर्डीकर महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात येणार आसल्याची माहिती पोलिस निरीक्षक मारकड व सपोनि विवेकानंद पाटील यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरीकांनी आता खरी काळजी घेण्याची गरज असून शासनाच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन उपसरपंच शशीकांत चौधरी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या