बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

27

सामना ऑनलाईन, लंडन

कन्जरव्हेटिव्ह पक्षांतर्गत पंतप्रधान पदासाठी झालेल्या निवडणुकीत लंडनचे माजी महापौर आणि परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांचा विजय झाला. जॉन्सन यांनी त्यांचे प्रतिस्पधीं असलेल्या परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट यांचा पराभव केला. त्यामुळे थेरेसा मे यांच्यानंतर ब्रिटनची धुरा आता बोरिस जॉन्सन सांभाळणार आहेत.

ब्रेग्झिटची अंमलबजावणी न केल्यामुळे मे यांनी 7 जूनमध्ये राजीनामा दिला. त्यानंतर निवडणुकीची ही प्रक्रिया राबवण्यात आली. जॉन्सन यांच्यासमोरही ब्रेग्झिटच्या अंमलबजावणीचे आव्हान असणार आहे. कन्जरव्हेटिव्ह पक्षाच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी काल 1 लाख 59 हजार 320 सदस्यांनी मतदान केले. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत  जॉन्सन यांना 92 हजार 153 मते तर हंट यांना 46 हजार 656 मते मिळाली. यातील 509 मते रद्द करण्यात आली. थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर  जॉन्सन यांचेच नाव चर्चेत होते. राणी एलिझाबेथ-2 कडे मे राजीनामा सादर करतील, त्यानंतर जॉन्सन उद्या, बुधवार, 24 जुलैला अधिकृतपणे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतील.

आपली प्रतिक्रिया द्या