श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराजांचे पादुकास्थान असलेल्या ‘ओम सद्गुरू प्रतिष्ठान’ येथे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2021 या कालावधीत हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून बोरीवली येथील नवनीत हॉस्पिटल शेजारील ओम सद्गुरू प्रतिष्ठान येथे हा सप्ताह पार पडणार आहे. या सप्ताहाअंतर्गत रोज सकाळी 6 वाजता सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्या ध्वनिमुद्रित आवाजातील श्रीगुरुचरित्राच्या अध्यायांचे पारायण होईल. हा संपूर्ण उत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी शशी करंदीकर यांना 9769939045 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

आपली प्रतिक्रिया द्या