लोकलवर काचेची बाटली फेकली, महिला जखमी

48

सामना ऑनलाईन। मुंबई

ट्रेनमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या महिलांवर वस्तू फेकून त्यांना जखमी करण्याच्या घटना सुरुच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी पनवेल ट्रेन बेलापूर येथे पोहचत असताना महिलांच्या डब्यावर अचानक एक काचेची बाटली येऊन आदळली व फुटली. यावेळी काचेचे तुकडे दरवाज्यात उभ्या असलेल्या महिलांच्या अंगावर उडाले. यातील काही तुकडे एका दिव्यांग मुलीच्या हातात घुसल्याने ती जखमी झाली आहे.

या घटनेनंतर महिला प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वेरुळा शेजारील झोपडपट्टीमध्ये राहणारे टपोरी मुलंचं हे कृत्य करत असल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीही याच मार्गावरून जाणाऱ्या लोकलवर अज्ञातांनी लिंबू फेकून मारले होते. यात एका प्रवाशाच्या डोळ्याला दुखापत झाली होती. यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या