आंतरराष्ट्रीय बॉक्सर जितेंद्र मानची हत्या

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय बॉक्सर जितेंद्र मान याची नोएडा येथील राहत्या घरी गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर ४८ तास त्याचा मृतदेह घरातच पडून होता. शुक्रवारी जितेंद्रचा भाऊ त्याच्या घरी गेल्यावर या हत्येचा प्रकार उघडकीस आला.

जितेंद्र मान (२७) हा ग्रेटर नोएडा येथील एवीजे हाइट्स सोसायटीमध्ये राहत होता. १० जानेवारीला तो जिममध्ये गेला, त्यानंतर तो जिममध्ये दिसला नसल्याचे जिम संचालकाने पोलिसांनी सांगितले. जिममध्ये येत नसल्याने संचालकाने त्याला फोन केले पण त्याचा फोन बंद येत होता. जिम संचालकाने तो जिममध्ये आला नसल्याचे जितेंद्रचा चुलत भाऊ प्रितम याला कळवले. शुक्रवारी प्रितम जितेंद्रच्या घरी गेला तेव्हा त्याला जितेंद्रचा मृतदेह दिसल्याने ही घटना समोर आली. जितेंद्रच्या घरात दारू, कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या सापडल्या असून त्याचा मोबाईल फोन आणि घराची किल्ली गायब आहे. जितेंद्रच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या जखमा आढळून आल्याने जितेंद्रची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जितेंद्र मानने ज्यूनियर व सिनीयर गटात रशिया, क्यूबा, फ्रान्स आणि उझबेकिस्तानमध्ये पदके कमावली आहेत. जितेंद्र जिम सध्या जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. काही दिवसांसाठी जितेंद्र सुट्टीवर होता. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या