केरळमध्ये प्रेयसीला पेटवून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

 

सामना ऑनलाईन। तिरुवनंतपुरम

प्रेयसी भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने रागाच्या भरात एका प्रियकराने भरवर्गात तीच्यावर पेट्रोल टाकून तीला पेटवले व त्यानंतर स्वताला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची महाभयंकर घटना केरळमध्ये घडली आहे. यात तरुणीचा मृत्यू झाला असून तरुणाची प्रकृति चिंताजनक आहे. हे दोघेही कोट्टायम मेडीकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

प्रियकराचे नाव आदर्श असून त्याच्याच वर्गात शिकणा-या एका तरुणीबरोबर त्याचे प्रेमसबंध होते. पण काही दिवसांपासून तीने त्याच्याशी बोलणे, भेटणे बंद केले. प्रेयसीच्या वागण्यात अचानक झालेल्या या बदलाने तो निराश झाला होता. त्याने अनेकवेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तो व्यथित झाला होता.यातूनच त्याने तीला कायमची अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी सकाळी आदर्श अचानक वर्गात आला .त्याला बघून प्रेयसी वर्गाबाहेर जाऊ लागली.त्याचवेळी त्याने प्रेयसीच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले आणि लाईटरने तीला पेटवले. याप्रकारामुळे भेदरलेली तरुणी मदतीसाठी आरडाओरड करत वर्गाबाहेर धावत सुटली.त्यानंतर आदर्शने स्वतालाही पेटवून घेतले.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून तरुणाची प्रकृति चिंताजनक आहे.