प्रेमप्रकरणातून तरुणीवर धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

13
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

आपले प्रेम असलेल्या तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या संशयातून तरुणाने तरुणीवर धारधार शस्त्राने वार केला. त्यानंतर स्वतःवरही वार केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडली. रोशन भिमदास कदम (२१) व दिप्ती मोहन हेमन (१७) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोशनचे दीप्तीवर प्रेम होते. कामानिमित्त तो मुंबईत असायचा. मात्र दीप्तीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय रोशनला होता. याचाच माग काढण्यासाठी तो गावात आला होता. सोमवारी सकाळी त्याने दीप्तीला या प्रकरणाचा जाब विचारत धारधार शस्त्राने वार केले. या प्रकारात दीप्ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर रोशनने हातातील हत्याराने स्वतःच्या हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या