‘गे’ म्हणून चिडवल्याने नऊ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

34

सामना ऑनलाईन । कोलोरॅडो

शाळेतील वर्गमित्रांनी ‘गे’ म्हणून चिडवल्याने एका नऊ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील कोलोरॅडो येथे घडली आहे. जॅमेल मिल्स असे त्या मुलाचे नाव असून तो जो शोमेकर एलिमेन्ट्री शाळेत शिकत होता.

समलैंगिक नात्याला आईचा नकार, मुलीने केली हत्या

जॅमेल हा गे होता व त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या काही मित्रांना याबाबत सांगितले होते. तेव्हापासून वर्गातील काही मुलं त्याला त्यावरून चिडवत होती. काही जणांनी तर त्याला तो गे आहे म्हणून त्याने आत्महत्या केली पाहिजे असे देखील सांगितले होते. त्यामुळे जॅमेल खूप दुखी झाला होता. जॅमेलने त्याच्या मोठ्या बहिणीला या विषयी सांगितले होते. मात्र तिने त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. अखेल जॅमेलने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

नवरा समलैंगिक असल्याच्या संशयावरून पत्नीची पोलिसात धाव

‘जॅमेलला त्याच्या गे असण्यावरून कधीच कोणती तक्रार नव्हती. उलट त्याला अभिमानाने याबाबत सर्वांना सांगायचे ठरवले होते. मात्र त्याला एवढ्या प्रमाणात त्रास दिला गेला असावा की त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यावरून तरी किमान आता शाळांमध्ये याविषयी जनजागृती केली पाहिजे, असे जॅमेलची आई लिआ पिअर्स यांनी सांगितले.

SUMMARY : Boy commits suicide in US after getting bullied for being gay

आपली प्रतिक्रिया द्या