धक्कादायक! जागा तीच.. घटना तशीच.. बाप-लेकाचा मृत्यू

17

सामाना प्रतिनिधी । राहुरी

वर्षभरापूर्वी वडिलांचा ज्या रस्त्यावर अपघात झाला होता, त्याच रस्त्यावर मुलाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा तरूण जागीच ठार झाला. सोमवारी सकाळी चिंचोली फाटा येथील हॉटेल न्यू प्रसादजवळ हा अपघात झाला. संतोष लोंढे(१९) असं या मुलाचं नाव आहे.

संतोष न्यू प्रसाद हॉटेलमध्ये वेटर होता. सोमवारी सकाळी हॉटेलला लागणारे इतर साहित्य घेऊन हॉटेलच्या दिशेला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव गाडीने संतोषच्या बाईकला जोराची धडक दिली. या धडकेत संतोष बाईकसह डिव्हाडरवर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. संतोषचे वडील रामदास यांचा एक वर्षापूर्वी चिंचोली फाट्याजवळ याच हॉटेलजवळ अपघाताच मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या