पूर्णा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

24

सामना प्रतिनिधी । पूर्णा

शहरातील सिद्धार्थनगर येथील एका तरुणाचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. पूर्णा नदीपात्रातील कट्यावर पोहोण्यास गेला असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शेख पाशा शेख जमाल (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सिद्धार्थनगर परिसरातील रहिवासी असलेला शेख जमाल हा युवक मंगळवारी सकाळी काही मित्रांसोबत पूर्णा नदीपात्रातील कट्यावर पोहोण्यास गेला असता. परंतु पाण्याच अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती त्याचे भाऊ शेख मोईनोद्दीन शेख जमाल यांनी पूर्णा पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्नालय पूर्णा येथे पाठवण्यात आला. या घटनेबाबत पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्सटेबल मोईन हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या