बोर्डात आलेल्या विद्यार्थ्याने गांजासाठी केली तीन भिकाऱ्यांची हत्या

917
murder

दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवून बोर्डात आलेल्या विद्यार्थ्याने अमली पदार्थासाठी चार जणांची हत्या केली आहे. त्यातील तिघे जण हे भिकारी असून एक सुरक्षा रक्षक आहे. या चौघांनाही त्याने दगडाने ठेचून मारले आहे. तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील सिथेरीयूर गावात ही घटना घडली आहे.

एम.अंडीसामी असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून गेल्या तीन महिन्यात त्याने या हत्या केल्या आहेत. अंडीमासी हा 2014 मध्ये दहावीची परिक्षा पास झाला होता. 92 टक्के गुण मिळवून तो बोर्डात आला होता. मात्र अंडीमासीच्या कुटुंबीयांकडे त्याच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने त्याने कॉलेजला न जाता नोकरी करण्यास सुरुवात केली. नोकरी करतानाच त्याला गांजाचे व्यसन लागले होते. गांजासाठी तो कायम त्याच्या आईकडे पैसे मागायचा. मात्र डिसेंबर महिन्यात त्याच्या आईकडचेही पैसे संपल्यामुळे तो वेडापिसा झाला होता. त्यानंतर त्याने वेलाकन्नी येथे एका भिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली. त्या भिकाऱ्याकडचे पैसे लुटून त्याने गांजा विकत घेतला.

त्यानंतर 1 फेब्रुवारीला पुन्हा त्याच्याकडील पैसे संपल्याने त्याने एका 45 वर्षीय भिकाऱ्याची त्यानंतर 3 फेब्रुवारीला 60 वर्षीय भिकाऱ्याची व 5 फेब्रुवारीला 80 वर्षीय सुरक्षा रक्षकाची हत्या करत त्यांच्याकडील पैसे लुटले. पोलिसांना या हत्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंडीमासी दिसून आला. त्यानंतर तब्बल 13 दिवस पोलिसांना चकमा दिल्यानंतर त्याला 18 फेब्रुवारीला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या