आईसाठी योग्य वर हवा, तरुणाची फेसबुक पोस्ट वेगाने व्हायरल

1667

काही दिवसांपूर्वी आस्था वर्मा आणि मोहिनी विग या तरुणींची ‘आईसाठी योग्य वर हवा’ अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता अशीच एक पोस्ट पश्चिम बंगालमधील एका तरुणाने केली आहे. हुगली येथील गौरव अधिकारी हा तरुण आपल्या 45 वर्षीय विधवा आईसाठी योग्य वर शोधत आहे. या तरुणाने फेसबुकवर आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला असून योग्य वरासाठीच्या काही अटीही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्या आहेत.

‘बीबीसी हिंदी’ने दिलेल्या वृत्तानुसार, गौरव अधिकारी हा तरुण आपल्या आईसोबत हुगली जिल्ह्यातील फ्रेंच कॉलनी येथे राहतो. गौरवच्या आईचे वय 45 वर्षे इतके आहे. त्यांचे पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गौरवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतो. त्यामुळे आपली आई दिवसभर एकटीच घरी असते. त्यामुळे तिला प्रचंड एकटेपणा वाटतो. म्हणूनच आपण तिच्यासाठी एका चांगल्या वराच्या शोधात आहोत.’

गौरवने 10 नोव्हेंबरला फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. यानंतर ही पोस्ट वेगाने सोशल मीडियावर शेअर होत आहे. त्याच्या पोस्टखाली लाईक्स, शेअर आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. या प्रतिक्रियांमधून काही लोकांनी गौरवची खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी त्याचे जोरदार कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मदत करण्याचे अश्वासनही दिले आहे.

दोन तरुणी आईसाठी शोधतायंत ‘योग्य’ नवरा, ‘या’ आहेत अपेक्षा!

योग्य वरासाठी ‘या’ आहेत अटी…

आईसोबत लग्नाचा विचार करणारा वर हा स्वत:च्या पायावर उभा असावा. आईला पुस्तक वाचन आणि संगित आवडते. मात्र, पुस्तके आणि संगित ही जोडीदाराची जागा घेऊ शकत नाहीत. तिचे एकटेपण दूर करण्यासाठी जोडीदाराने तिच्या प्रत्येक सुख-दु:खात सोबत असायला हवे, अशी भावनाही गौरव आपल्या पोस्टमधून व्यक्त करतो.

लोक खिल्ली उडवतात पण…

लोक माझी खिल्ली उडवतील परंतू, एक पूत्र या नात्याने मी माझ्या आईचे आयुष्य आनंद बनविणे हे माझे माझे कर्तव्यच आहे. आणखी काही दिवसांनी माझे लग्न होईल. मी घर आणि माझ्या नोकरी-व्यवसायात व्यग्र होईल. तेव्हा आई अधिक एकटी पडेल. तिला एकटेपणा सतावत राहीन. त्यापेक्षा ही चांगले की तिने नव्या जोडीदारासोबत नवे आयुष्य सुरु करावे, असे गौरव आपल्या पोस्टमध्ये नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या