अबब..! पाच इंचांचा अंगठा, तरुण रातोरात झाला स्टार

2235

साधारणत: सामान्य माणसाच्या हाताच्या अंगठ्याची उंची एक दोन ते अडीच इंच असते. परंतु तब्बल पाच इंचांचा भलामोठा अंगठा असणाराही एक तरुण असून टिकटॉकमुळे तो रातोरात स्टार झाला आहे. त्याचा लांबलचक अंगठ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाच इंच अंगठाधारी तरुणाचे नाव जेकब पिना असून तो वेस्टपोर्टचा रहिवासी आहे. 20 वर्षाच्या जेकबने आपल्या अंगठ्याचा व्हिडीओ टिकटॉवर शेअर केला आहे. ‘मित्रांनो, हा माझा अंगठा आहे. हा खूप मोठा असून खरा आहे. मी कधीही अंगठायुद्ध (थंबबॅटल) हरलो नाही’,असे कॅप्शन जेकबने व्हिडीओला दिले. यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडीओला 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे, तर 37 हजारपेक्षा जास्त लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा आकडा वाढतच आहे.

लहानपणापासून आपला अंगठा मोठा असल्याचे जेकबने सांगितले. यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे त्याने सांगितले. इतरांपेक्षा आपण वेगळे असल्याचा आनंद असल्याचेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या