धक्कादायक! गरोदर अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने युट्यूबवर पाहून केला गर्भपात

2896

अल्पवयीन प्रेयसी गर्भवती असल्याचे कुणालाही कळू नये म्हणून तिच्या प्रियकराने युट्यूबवर पाहून तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चेन्नई येथे समोर आली आहे. सध्या त्या मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर चेन्नईतील रोवापुर्रम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

पोन्नेरी येथे राहणाऱ्या राघव (नाव बदलले आहे) या 27 वर्षीय तरुणाचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याच संबंधातून ती मुलगी गरोदर देखील राहिली. मात्र मुलगी गरोदर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना कळू नये म्हणून राघवने त्याच्या प्रेयसीचा स्वत:चा गर्भपात करण्याचे ठरवले. त्याने युट्यूबवर पाहून गर्भपातासाठी लागणारे सर्जिकल सामान देखील आणले. त्यानंतर तो त्याच्या प्रेयसीला घेऊन त्याच्या काजूच्या फॅक्टरीवर गेला. तिथे त्याने तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.

राघवने सर्जिकल साहित्याच्या सहाय्याने अर्भकाला बाहेर काढण्याऐवजी त्याने हाताने खेचायचा प्रयत्न केला. मात्र गर्भपाताचे वैद्यकीय ज्ञान नसल्याने त्याला बाळाला कसे खेचावे हेच समजत नव्हते. त्याला बाळाचे डोके हाताला लागले असे वाटत असतानाचा अर्भकाचा हात तुटून त्याच्या हातात आला. त्यानंतर त्याच्या प्रेयसीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. ते पाहून राघव इतका घाबरला की त्याने प्रेयसीला तसंच रक्ताच्या थारोळ्यातून उचलून बाईकवरून स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांना राघवचा प्रताप समजल्यानंतर तसेच मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला चेन्नईतील रोवापुर्रम रुग्णालयात हलविण्यात सांगितले. तिथून राघव तिथे राघवने डॉक्टरांना सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला.

मुलीच्या पालकांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांनी राघव विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत विविध गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच चेन्नई रुग्णालयातील डॉक्टरांनी ही राघवला गर्सभपाताच्या सर्जरीचे वैद्यकीय ज्ञान नसतानाही त्याने गर्भपात केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जर त्या मुलीचा मृत्यू झाला तर राघव विरोधात हत्येचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या