प्रियकराने अश्लील फोटो पाठवले, लग्नाच्या 24 तास आधी भावाने केली बहिणीची हत्या

प्रियकराने अश्लील फोटो व्हायरल केल्याने एका भावाने बहिणीची लग्नाच्या 24 तास आधी हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे घडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी ही मेरठमधील लिसाडी येथे राहते. ही तरुणी तिच्या घरातील सर्वात लहान मुलगी आहे. तिचे काही काळापूर्वी तिच्याच आतेभावाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. याची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. त्यामुळे त्यांनी तिचं लग्न ठरवलं. रविवारी हे लग्न होणार होतं.

तिच्या लग्नाबाबत माहिती मिळताच पीडितेचा प्रियकरही नाराज झाला होता. त्याने हे लग्न थांबवायचा प्रयत्न करून पाहिला. त्यात त्याला यश आलं नाही. अखेर शुक्रवारी त्याने पीडितेच्या सख्ख्या भावाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले.

तिचे फोटो पाहून त्यांच्या घरात एकच वादंग माजलं. पीडितेच्या कुटुंबाने त्याचा राग कसाबसा शांत केला. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी ही तरुणी दात घासत असताना तिचा भाऊ पुन्हा तिच्याकडे आला. यावेळी त्याच्या हातात बंदूक होती. त्याने तिच्यावर गोळी झाडली. तरुणी जागीच गतप्राण झाली.

या प्रकरणी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीने पोलिसांना शरण आला असून त्याला अटक करण्यात आली आहे तसंच हत्येत वापरलं गेलेलं पिस्तुलही जप्त करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या