प्रेयसीला भेटण्यासाठी ‘तो’ चक्क मुलगी बनला, पण निम्म्या रात्री त्याच्यासोबतच ‘नको’ तो किस्सा घडला

3784

‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ हा डायलॉग गुजरातमधील एका प्रियकराला एकदम फिट्ट बसतोय. लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी एक प्रियकर एवढा आतुर झाला की त्याने चक्क मुलीचा वेष घेतला. मुलींसारखा पंजाबी ड्रेस घालून, पावडर-लिपस्टिक लावून हा तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी निम्म्या रात्री निघाला. मात्र भर रस्त्यात त्याची पोलखोल झाली आणि तो पडकला गेला.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना वलसाड येथील परडी भागातील आहे. येथे एका 19 तरुणाला पोलिसांनी निम्म्या रात्री मुलीच्या कपड्यात पकडले. पोलीस महिला आणि मुलींची चौकशी करत नाही म्हणून तरुणाने प्रेयसीला भेटण्यासाठी मुलीचे कपडे घालून जाण्याचे ठरवले. निम्या रात्री 2 वाजून 40 मिनिटांनी हा तरुण घरातून बाहेर पडला. पोलीस मुलींना हमखास हटकणार नाही अशी समजूत असलेल्या तरुणाला नंतर मात्र पस्तावा झाला.

एवढ्या रात्री एक मुलगी पंजाबी कपडे घालून निघाल्याचे पाहून पोलिसांना संशय झाला. हा तरुण स्कुटी घेऊन घरातून निघाला होता. मात्र पोलिसांनी त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी त्याला भोसलापाडा-परिया रोडवर थांबवले. पोलिसांनी त्याला एवढ्या निम्म्या रात्री बाहेर का फिरते? असा सवाल केला. मात्र बिंग फुटू नये म्हणून मुलीच्या वेशातील तरुणाने तोंडातून ब्र देखील काढला नाही. पोलिसांना अधिकच संशय वाटल्याने त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी हटवली असता त्यांना धक्का बसला.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तरुणाने चकमा देण्यासाठी मुलींचा ड्रेस, चेहऱ्यावर ओढणी आणि वरतून मास्कही लावला होता. त्याने एवढा भारी गेटअप केला होता की सहजपणे त्याला ओळखणे अवघड होते. चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करण्यास सांगितले नसते तर त्याला ओळखणे कठीण होते. पोलीस आणि मुलीच्या आई-वडिलांना चकमा देण्यासाठी आपण असे केल्याचे।तरुणाने सांगितले.

दरम्यान, तरुणावर महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणावर गुन्हा दाखल होण्याची नको ती वेळ आली. मॅजिस्ट्रेटसमोर त्याला नेण्यात आले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या