‘रोखठोक’ मधील “ब्राम्हणांच्याही शौर्यकथा” या लेखाचे ब्राम्हण समाजाकडून स्वागत

88

सामना ऑनलाईन, पैठण

दै.सामना च्या ऊत्सव पुरवणीतील रोखठोक सदरात प्रसिद्ध झालेल्या “ब्राम्हणांच्याही शौर्यकथा” या लेखाचे पैठण शहरात जोरदार स्वागत झाले . ब्राह्मण सभेच्या सभागृहात दै.सामनाच्या अंकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या समाजाच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख तथा संपादक ऊध्दव ठाकरे व कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

सकाळी १०.३० वाजता माजी ऊपनगराध्यक्ष दिलिपकाका पोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मण सभेत बैठक आयोजित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व भगवान परशुराम यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा सुजाता भंडारी यांच्या हस्ते दै.सामना वृत्तपत्राच्या अंकांचे विधीवत वेदमंत्रघोषात पूजन करण्यात आले . ऊत्सव पुरवणीच्या रोखठोक मधील अंकांवर सामूहीक पुष्पवृष्टी करण्यात आली. “गोब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा … विजय असो !” “भगवान परशुरामांचा विजय असो !” अशा घोषणा देण्यात आल्या . दै. सामनाचे पैठण तालुका प्रतिनिधी बद्रीनाथ खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला .

brahmins-welcome-rokhthok-2

यावेळी बोलताना वेदशास्र संपन्न प्रसाद महाराज भागवत यांनी सांगितले की , दै.सामनाने वाढत्या जातीयवादावर नेहमीच आसूड ओढलेले आहेत . सर्व बाजूंनी ब्राह्मण समाजावर विखारी टिका चालू असताना कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत या समाजाची सकारात्मक बाजू मांडली आहे. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य तसेच राजसत्ता , युध्द , व राजकारण यांचे पौराणिक संदर्भ देत त्यांनी ब्राह्मण समाजातील क्षत्रियत्व नमूद केले. मुंबई येथील दारुबंदी ऊत्पादन शुल्क विभागाचे ऊप-अधिक्षक जयवंत पाटील यांनी यावेळी बोलताना प्रथम दै. सामना चे आभार मानले . पैठणचे इतिहास संशोधक कै. बाळासाहेब पाटील यांच्या पुरातन वस्तुसंग्रहालयावर दै. सामना ने प्रकाश टाकला. त्यातून शासकीय संग्रहालय ऊभे राहिले. असे सांगुन जयवंत पाटील यांनी ब्राह्मण हे क्षात्रतेज बाळगणारे आहेत. दक्षिण हिंदुस्थानवर ७०० वर्षे राज्य करणारे सातवाहनाचे राजघराणे ब्राह्मण होते . एक धिरसं , एक विरसं , एक शुरसं अन एक बम्मनसं हि या राघराण्याची बिरूदावली असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले . माजी ऊपनगराध्यक्ष दिलिप पोहेकर म्हणाले की दै. सामनाचे कौतुक करण्यासाठी सर्व समाज आज एकत्र आलेला आहे.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा ब्राह्मण सभेचे अध्यक्ष वे.शा.सं. सुयश शिवपुरी , शिवसेना शहरप्रमुख प्रकाश वानोळे ,नगरसेवक भूषण कावसानकर , माजी नगराध्यक्ष शेखर पाटील , भाजप शहराध्यक्ष विजय चाटुपळे , भूषण भंडारी , सुजाता भंडारी , गणेश साळजोशी , संजय कस्तुरे , ऊपेंद्र मुधलवाडकर , लक्ष्मीकांत पसारे , प्रमोद देवा आपेगावकर , संतोष जोशी , रेणुकादास गर्गे , प्रभाकर कावसानकर , शरद बिडकर समिर धर्माधिकारी ,सुदेश कुलकर्णी, वैदीक पुरोहीत बापुशाश्री गर्गे ऊत्तमगुरू सेवनकर , भालचंद्र दाणेकर,अनंत खरे गुरूजी , संतोष जोशी प्रभुकाका कावसनकर ,रवि कुलकर्णी,  राजेश जोशी  अनंतराव सेवनकर, अक्षय जोशी ,हरेश शिवपुरी, योगेश शिवपुरी, रमेश पाठक,संकेत कुलकर्णी ,रूषीकेश साळजोशी ,विनायक साळजोशी, संजय मुळे ,सखाराम भागवत ,प्रशांत टाक, शरदराव पिंपळकर,मधुकर दानेकर,गिरीष चाटुपळे, संजय चाटुपळे, राजेंद्र मांडे,ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा सौ सुजाता भंडारी, ऊपाध्यक्षा सौ.पाडळकर मॅडम,सचिव सौ. संगिता खरे ,यामिनी साळजोशी,गायत्री निरखे व वर्षा रहाटगांवकर ऊपस्थीत होते

आपली प्रतिक्रिया द्या