गुहागरमधील रिक्षा चालकाने वाचवले समुद्रात पडलेल्या अतिउत्साही पर्यटकाचे प्राण

246

सामना ऑनलाईन, गुहागर

उन्हाळ्यामध्ये कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढायला लागली आहे. समुद्र हे सगळ्या पर्टटकांसाठी आकर्षण असतं. मात्र या आकर्षणापोटी एका तरूणाचा जीव सुदैवाने जाता-जाता वाचला. कराडमध्ये राहणारे काही अतिउत्साही तरूण दुचाकीवरून हेदवी इथे आले होते. आचरटपणा आणि शो-शायनिंगच्या नादात पप्या नावाचा एक तरूण हेदवीजवळच्या बामणघळीत पडला. त्याला मदत मिळाली नसती तर तो वाहून गेला असता आणि बुडून त्याचा मृत्यू झाला असता हे घटना बघणाऱ्यांना कळालं होतं. या तरूणाच्या सुदैवाने निरंकार गोयथळे नावाचे रिक्षाचालक तिथे आले, त्यांनी तिथल्या महिलांच्या ओढण्या एकत्र करून या तरूणाला बाहेर काढला मात्र बाहेर आल्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करण्याऐवजी हे तरूण एकमेकांना शिव्या देत भांडायला लागले. हा प्रकार बघून गोयथळे यांनी डोक्याला हात लावला आणि तिथून निघून गेले.

आपली प्रतिक्रिया द्या