…आणि ते दोघं भाऊ लिंगबदल शस्त्रक्रिया करुन बहिणी झाले

लहानपणापासूनच शरीरात आणि मनातही मुलांसारख्या भावना नसल्याने दोन जुळ्या भावांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ते दोघे भाऊ आता बहिणी झाले आहेत. ही घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. ही शस्त्रक्रिया खार्चिक असल्याने त्यांच्या आजोबांनी आपली संपत्ती विकून त्यांना या शस्त्रक्रियेसाठी पैसे दिले आहेत.

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या दोन जुळे भाऊ लहानपणापासून नेहमी एकमेकांसोबत आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्ट एकत्रच केली आहे. त्यांनी एकमेकांना कायम साथ दिली आहे. ते दोघेही एकमेकांचे सपोर्टसिस्टम आहेत. पण या दोघांमध्ये लहानपणापासून मुलांसारख्या भावना नव्हत्या. त्यामुळे त्यांना अन्य मुलांसारखे वावरताना अवघडल्यासारखे व्हायचे.

ते दोघं कायम तणावाखाली असायचे. बऱ्याचदा त्यांचे हसे व्हायचे. अखेर दोघांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करुन मुलगी होण्याचे मनाशी ठरवले. त्यासाठी त्यांनी माहिती मिळवली. आपली नातवंडे आनंदी होण्यासाठी त्यांच्या आजोबांनी संपत्ती विकून 20 त्यांना हजार डॉलर दिले आणि दोघांनी एकत्र शस्त्रक्रिया करुन ते आता मुलगी झाले आहेत.

19 वर्षाच्या या दोघांची लिंगबदल शस्त्रक्रिया झाली असून आता मायला आणि सोफिया अशी त्यांची ओळख आहे. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये मुलांची भावना नसल्याने त्यांनी ही शस्त्रक्रिया करुन घेतली. शस्त्रक्रियेच्या आठवड्याभरानंतर दोघांनी व्हिडीओ कॉन्स्फरन्सद्वारे आपला अनुभव सांगितला.

मायला अर्जेंटिनामध्ये मेडिकलचे शिक्षण घेतेय. तिला आधीपासूनच स्वत:च्या शरीरावर प्रेम होते. मुलींसारखे तयार व्हायला तिला आवडायचे. मात्र मुलगा म्हणून समाजात वावरताना त्यांना अवघडल्यासारखे व्हायचे. पुढे त्या सांगतात की लैंगिक छळ, भांडण, यश-अपयश, आनंद-दुख या सगळ्या परिस्थितीत आम्ही कायम एकमेकींना पाठींबा दिला. तर सोफिया साओ पॉलोमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतेय. या शस्त्रक्रियेनंतर दोघीही आनंदी आहेत.

मायला आणि सोफियाची आई लूसिया डिसिल्वा यांनी सांगितले की, मला कायम माझी मुलं कसल्यातरी तणावाखाली, चिंतेत असल्याचे जाणवायचे. पण जेव्हा मी त्यांना मुलींसारखेच वागवायचे त्यावेळी दोघंही फार आनंदी व्हायचे. त्यातून मला त्यांच्या भावना कळत गेल्या. त्यांची मानसिकता समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करु लागलो.

त्यांच्या मनातील भावना समजल्यावर त्या दोघांच्या निर्णयाचा त्यांच्या पालकांनी कायम आदर केला. त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांच्या आजोबांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली. आपली संपत्ती विकून त्यांच्या आजोबांनी त्यांना 20 हजार डॉलरच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे दिले. सोफिया आणि मायका यांची आई दोघींना फार पाठिंबा देते.

ब्राझीलमध्ये ट्रान्सफोबीया जास्त आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ ट्रान्ससेक्श्युअलच्या आकड्यांनुसार मागच्या वर्षी ब्राझालमध्ये 175 लोक मारले गेले होते जे अन्य देशांच्या तुलनेत फार जास्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या