बोंबला! पालिकेच्या ऑनलाईन मिटिंगदरम्यान कॅमेरा राहिला ऑन, भलताच प्रकार झाला रेकॉर्ड

जगभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असताना सरकारी, खासगी कार्यालयाचे काम घरून सुरू आहे. अशा वेळी महत्वाच्या कामासंदर्भात बैठकीसाठी गुगल मिट, स्काइप, झूम यासारख्या ऍपचा वापर केला जात आहे. मात्र ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या एका बैठकीदरम्यान भलताच प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. येथील रियो डी जानेरिओ पालिकेच्या लाईव्ह बैठकीत एका सदस्याच्या लॅपटॉपमधील झूमचा कॅमेरा सुरूच राहिला आणि सेक्स व्हिडीओ रेकॉर्ड झाला.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियाच्या सिटी काउन्सिलच्या ऑनलाइन बैठकीदरम्यान एक विचित्र प्रकार घडला. कोरोना संकटकाळात पालिका यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा कशी दिली जावी, याबाबत या बैठकीत चर्चा सुरू होती. याच दरम्यान अचानक एक सदस्य व्हिडीओ कॉलमधून बाहेर पडला. मात्र लॅपटॉप मधील झूम ऍपचा कॅमेरा बंद करण्यास तो विसरला. कॅमेरा बंद न करता येथे एक कपल सेक्स करताना दिसले.

दरम्यान, सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही बैठक पुढील 4 तास सलग सुरू होती. बैठकीस उपस्थित असलेल्या नगरसेवकांना कपलचे लाईव्ह सेक्स करतानाचे दृश्य दिसले, तरीही सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची बैठक चालू ठेवली. या बैठकीत शहरातील अनेक महत्त्वाचे लोक उपस्थित होते.

हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बैठकीला उपस्थित लिओनेल ब्रिजोला म्हणाले की, हे घडत असल्याचे लक्षात येताच आम्ही तत्काळ ऑडिओ आणि व्हिडीओ नियंत्रण पथकाला फीड बंद करण्यास सांगितले. मात्र हा विषय सध्या सोशल मीडियावर चवीने चर्चिला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या