ब्राझीलचा स्टार खेळाडू काकाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम

सामना ऑनलाईन । ब्रासिलिया

फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी बातमी असून ब्राझीलचा स्टार खेळाडू काकाने (३५) आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर काका एसी मिलान या संघामध्ये नव्या भूमीकेत दिसण्याची शक्यता आहे. २००२मध्ये झालेल्या विश्वचषकात ब्राझीलने विजेतेपद मिळवले होते आणि काकाने त्या विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काका म्हणाला की, मी निवृत्ती घेत असलो तरी फुटबॉलसोबत माझे नाते कायम राहणार आहे, मात्र माझी भूमीका आता बदलणार आहे. आता मी एक खेळाडूच्या रुपात दिसणार नाही. मी एका फुटबॉल क्लबच्या मॅनेजरचे पद स्वीकारू शकतो. याबाबत एसी मिलान या क्लबसोबत चर्चा सुरू आहे, असेही काकाने सांगितले.

काकाचा जन्म १९८२मध्ये झाला. त्यानंतर काकाने १९९४ला फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात केली. ब्राझीलचा प्रसिद्ध क्बल साओ पाऊलो या क्लबकडून काकाने आपली कारकिर्द सुरू केली. त्यानंतर २००३मध्ये एसी मिलान या क्बलमध्ये गेला होता. काकाने २००७मध्ये एसी मिलान या क्लबकडून खेळताना जगातिल सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला होता.