ब्रेड उत्तप्पा

साहित्य – ब्रेडच्या सहा स्लाईस, ३ चमचे जाड रवा, ३ चमचे तांदूळाचे पीठ, ३ चमचे मैदा, अर्धी वाटी दही, १ चमचा मीठ, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा काळी मिरी पूड, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो (बिया काढलेला), एक किसलेले गाजर, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ चमचे किसलेले आले, अर्धा डाव तेल

कृती – कडा काढून ब्रेडच्या स्लाईसचे तुकडे करुन मिक्सरमध्ये टाका. ब्रेडच्या तुकड्यांसोबत मिक्सरमध्ये तांदूळाचे पीठ, मीठ, दही आणि पाणी घालून चांगले मिक्स करुन पेस्ट तराय करा. या पेस्टपासून उत्तप्यासाठी पीठ पुन्हा थोडे पाणी घालून चांगले मळून पीठ तयार करुन घ्या. त्यात जिरे, बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो, किसलेले गाजर, किसलेले आले, बारीक चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून घेऊन त्यावर चमच्याने थोडेसे तेल सोडून त्यावर अर्धा कांदा किंवा कच्चा बटाटा तवाभर फिरवून मग हाताने तव्यावर थोडेसे पाणी शिंपडा आणि सुती कपड्याने तवा पुसून घ्या व तव्याला सगळीकडे तेल लावून घ्या. दोन डाव पीठ तव्यावर घालून सगळीकडे गोल फिरवत पसरून घ्या. चमच्याने उत्तप्याच्या सगळ्या कडेने तेल सोडा व दोन मिनिटे भाजून घेऊन पलटी करा व दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्या. (आंच मध्यमच ठेवा, मोठी आंच ठेवल्यास उत्तप्पा आतपर्यंत शिजणार नाही व आतून काच्चाच राहील). याच पद्धतीने उर्वरीत उत्ताप्पा बनवा. खोबर्‍याची चटणी किंवा कोथिंबीरीची हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम उत्तप्पा सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या