ब्रेडचे गुलाबजाम

212

साहित्य

दहा ते बारा ब्रेड, अर्धी वाटी दूध, एक वाटी पाणी, दोन वाट्या साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्या. ब्रेड कुस्करून त्यात दूध घालून व्यवस्थित मळून घ्या. साखर व पाणी एकत्र करून त्याचा पाक तयार करून घ्या. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून ते मंद आचेवर तळून घ्या. हे तयार गोळे साखरेच्या पाकात घाला. झटपट ब्रेडचे गुलाबजाम तयार.

आपली प्रतिक्रिया द्या