लसवंत व्हा! 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस मिळणार

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशात करोना व्हायरसवरील लस 18 वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने 1 मे पासून लसीकरण सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्यामध्ये 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनची लस घेण्यास पात्र ठरवण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकराने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या